Header AD

‘माझा होशील ना!’च्या आगामी भागात; सई करतेय आदित्यला सुयश सोबतच्या कॉफी डेटविषयी सांगून जळवायचा प्रयत्न!
■‘माझा होशिल ना!’च्या आगामी भागात, जेव्हा सुयशने सईला सांगितले की जेव्हा सईला गरज होती तेव्हा तिला त्याची आठवण झाली आणि हे खऱ्या मैत्रीचे लक्षण आहे. तेव्हा सईने देखील कबूल केले की तिच्याकडे फक्त एकाच डॉक्टरांचा नंबर सेव्ह होता आणि तो त्याचा होता. पण तू अगदी खऱ्या मित्राप्रमाणेच मदतीला धावून आलास याबद्दल तिला कृतज्ञ वाटते आहे. आणि यावर सुयश तिला मित्र म्हणून कॉफी डेटवर येण्याचा आग्रह करतो. सई नयनाला याविषयी सांगते. 


सई नयनाला सांगते की, ती आदित्यला सुयशबरोबरच्या तिच्या कॉफी डेटविषयी सांगेल आणि हे ऐकून त्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होते का ते पाहता येईल. त्यानुसार, ती आदित्यला कॉल करते आणि त्याला सुयश सोबतच्या कॉफी डेटविषयी सांगून त्याला जळवण्याचा प्रयत्न करते. सई आणि आदित्यच्या प्रेमाच्या रोमँटीक प्रवासात काय सईचा बेत यशस्वी होईल...?


‘माझा होशिल ना!’ मध्ये पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी, याचे प्रीमियर भाग झी 5 क्लबवर पाहता येतील.

‘माझा होशील ना!’च्या आगामी भागात; सई करतेय आदित्यला सुयश सोबतच्या कॉफी डेटविषयी सांगून जळवायचा प्रयत्न! ‘माझा होशील ना!’च्या आगामी भागात; सई करतेय आदित्यला सुयश सोबतच्या कॉफी डेटविषयी सांगून जळवायचा प्रयत्न!   Reviewed by News1 Marathi on December 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads