Header AD

थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीमधील थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार असून या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत.


       कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे त्याआनुषांगाने कल्याण डोंबिवली आणि परिमंडल ३ परिसरात कुठेही  रात्री ११ नंतर ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन कोणतेही नववर्षाच स्वागत किंवा इतर कार्यक्रम करणार नाहीत यासाठी काटेकोर नियोजन आणि बंदोबस्त लावला आहे. त्यानुसार दुर्गाडी नाका, गांधारी नाका, शहाड ब्रिज, पलावा ब्रिज, बदलापूर नाका आणि टाटा पॉवर हाउस नाका या ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. याठिकाणी बारकाईने सर्व वाहनचालक आणि प्रवासी यांची मद्यसेवन आणि इतर तपासणी करण्यात येणार आहे.  


        कोरोना संबंधीच्या मास्क आणि इतर बाबतीतची तपासणी देखील होणार असून, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर एकत्र येऊन सेलिब्रेशनकरून कोरोनाला आमंत्रण देऊ नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असून पोलिसांची  २० विशेष पथके तळीरामांवर नजर ठेवणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर  थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads