Header AD

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कै. काशीबाई कुंभारे आयुर्वेदिक उपचार व प्रशिक्षण विद्यालयाचे भूमिपूजन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कीर्ती संजीवन आयुवैदिक शैक्षणिक चॅरिटेबल संचालित कै काशीबाई महादेव कुंभारे आयुर्वेदिक उपचार व प्रशिक्षण विद्यालय दहीवली कुंदे येथे सुरू करण्यात येणार आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या केंद्राचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि.वी. पवार, उपप्राचार्य विठ्ठल सोनटंकेजीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविदेसरपंच जागृती देवकरसुरेश सुरोशीकै काशीबाई महादेव कुंभारे आयुर्वेदिक उपचार व प्रशिक्षण विद्यालय अध्यक्ष दंताराम कुंभारेसचिव अविनाश मांजरेकरखजिनदार मदन अचवल आदी उपस्थित होते. माझ्या मतदार संघात प्रथमच आयुवेदिक विद्यालय सुरू होत असून  त्यासाठी माझ्या कडून सर्व सहकार्य केले जाईल. कोरोना आजार झाल्यामुळे आयुर्वेदिक औषधांकडे आपण बघायला लागलो. पूर्वी आजीबाईचा बटवा वापरला जात होतापरंतु आता आपण सुनबाईचे ऐकतो व मेडिकल औषधे घतो. मेडिकल औषधांमुळेच आपल्याला त्रास होतो. सध्या आयुवैदिक औषधांची आवशकता आहे. कुंभारे कुटुंबियांनी या आयुर्वेदिक केंद्राला दोन एकर जागा देऊन चांगले काम केले असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष दंताराम कुंभारे यांच्याकडून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कै. काशीबाई कुंभारे आयुर्वेदिक उपचार व प्रशिक्षण विद्यालयाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कै. काशीबाई कुंभारे आयुर्वेदिक उपचार व प्रशिक्षण विद्यालयाचे भूमिपूजन Reviewed by News1 Marathi on December 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads