Header AD

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५४,१६० एकूण रुग्ण तर १०६१ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १४१ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण ,कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 

५४,१६० झाली आहे. यामध्ये १६८२ रुग्ण उपचार घेत असून ५१,४१७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २७कल्याण प – ३७डोंबिवली पूर्व – ३१डोंबिवली प – १३मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ६ रूग्णाचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून तसेच ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक

◆तक्रार मागे घेण्यासाठी केली मारहाण   केडीएमसी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्य...

Post AD

home ads