Header AD

कोव्हिड-१९ लसीच्या आशेने सोन्याचे आकर्षण कमी; बेस मेटल व कच्च्या तेलाला दिलासा मिळाला

 मुंबई, १४ डिसेंबर २०२० : अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा व संभाव्य कोरोना विषाणू लसीच्या आशामुळे पिवळ्या धातूचे आकर्षण कमी दिसून आले. परिणामी जोखिमीच्या गुंतवणूक मालमत्तेकडे बाजाराचा कल दिसून आला. तसेच बेस मेटल आणि कच्च्या तेलाच्या दरांनाही आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: अमेरिकेकडून प्रोत्साहनपर मदतीची चर्चा बारगळल्यामुळे स्पॉट गोल्ड काही प्रमाणात म्हणजेच ०.०८% नी वधारले. अमेरिकी डॉलरची मजबूती आणि संभाव्य कोरोना विषाणू लसीची आशा वाढल्याने गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्यापासून दूर जाताना दिसले.

काही देशांमध्ये कोव्हिड-१९ लसीचे वितरण सुरु झाल्याने गुंतवणूकदार जोखिमीच्या मालमत्तांकडे वळू लागले आहेत. तथापि, जगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढू लागल्याने तसेच अनेक देशांमध्ये अंशत: लॉकडाऊनची स्थिती असल्याने पिवळ्या धातूच्या दरांना आधार मिळाला. तर गुंतवणूकदारांची जोखिमीची भूकही कमी झाली. चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे, व काही चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लावण्याच्या निर्णयामुळे सोन्याला काहीसा आधार मिळाला.

अमेरिकी नियामकांकडून फायजर व बायोटेक कंपनीच्या लसीला मंजूरी मिळाल्याने पिवळ्या धातूच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल: संभाव्य कोव्हिड-१९ लसीबाबत सकारात्मकतेचे वातावरण असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.७% नी वाढले. यामुळे आर्थिक सुधारणेच्या शक्यतेत वाढ झाली असून कच्च्या तेलाची मागणीही वाढली. कच्च्या तेलाच्या दरांना पाठींबा देणारा आणखी एक घटक म्हणजे ओपेक-रशिया कराराद्वारे जानेवारी २१ नंतर तेलाचे उत्पादन ५००,००० बॅरल प्रति दिन या प्रमाणात वाढवले जाईल.

तथापि, अमेरिकी क्रूड साठ्यात अचानक वाढ झाल्याने तसेच अमेरिका-चीनदरम्यानच्या तणावामुळे नफ्यावर मर्यादा आली. या महिन्याच्या सुरुवातीस, एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या अहवालात, अमेरिकी क्रूडसाठ्यात १५.२ दशलक्ष बॅरलनी वाढ दर्शवली गेली. ती १.४ दशलक्ष बॅरलने कमी होण्याचा अंदाज होता.


बेस मेटल्स: एलएमई बेस मेटलचे निकाल बहुतांशत: सकारात्मक होते. या समूहात निकेलने सर्वाधिक नफ्याची कामगिरी दर्शवली. चीनकडून वाढीव मागणी व कोव्हिड-१९ लसीच्या आशेमुळे मागणीला आधार मिळाला. अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाली तसेच अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीची आशा नसल्याने धातूंच्या दरात फार बदल झाले नाही. चीनमधील कमी साठ्यामुळे तसेच प्रामुख्याने स्टील मिल्सकडून दमदार मागणी असल्याने निकेलचे दर वाढले. जिओटेक्निकल बिघाडामुळे वेदांताची ग्रॅमबर्ग झिंक खाण बंद पडल्याने झिंकचे दर वाढले.


तांबे: लॉकडाऊन व अमेरिका-चीनमधील तणावामुळे तांबे व इतर औध्योगिक धातूंच्या मागणीवर परिणाम होऊन एलएमईवरील तांब्याचे दर ०.०१% वाढले. संभाव्य लसीच्या आशेमुळे अतिरिक्त मदत झाल्यानेही औदयोगिक धातूंच्या दरांना आधार मिळला. तथापि, अमेरिकी डॉलरची मजबुती, अमेरिका-चीन दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे याउलट परिणामी दिसून येण्याची शक्यता आहे.

कोव्हिड-१९ लसीच्या आशेने सोन्याचे आकर्षण कमी; बेस मेटल व कच्च्या तेलाला दिलासा मिळाला कोव्हिड-१९ लसीच्या आशेने सोन्याचे आकर्षण कमी; बेस मेटल व कच्च्या तेलाला दिलासा मिळाला Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads