Header AD

साविंधान जनजागृती अभियान राबवणारे पत्रकार महेंद्र सोनावणे यांना 'संविधान रक्षक'पुरस्कार

भिवंडी ,  प्रतिनिधी   :  26 नोव्हेंबर संविधान दिन राज्यात उत्साहात साजरा होत असतानांच कास्टट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, अंबरनाथ शाखेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानावर प्रबोधनात्मक, उल्लेखनिय कार्य करणारे पत्रकार महेंद्र सोनावणे तथा सुप्रसिद्ध जादूगार एस्.महेंद्रा यांना संघटनेने संविधान रक्षक'पुरस्कार प्रदान करून सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, हा पुरस्कार  सोहळा अंबरनाथ येथील प्रशासकीय भवनातील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. 


महाराष्ट्र कास्टट्राईब संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष गाडे यांच्या हस्ते महेंद्र सोनावणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकार महेंद्र सोनावणे हे 'सत्य संविधान' या साप्ताहिकाचे संपादक असून   महाराष्ट्रात प्रकाशित होणारे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे भिवंडी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्याबरोबरच भारतीय संविधानाचे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सन 2005 पासुन त्यांनी संविधान प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्य संविधान या  साप्ताहिकेचा प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन विशेषांक प्रकाशित होत आहे. 


जादूकलेचे माध्यमातून  त्यांनी भारतीय संविधानावर एक अनोखा प्रयोग तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात जादूगार एस्.महेंद्रा या नावाने त्यांने भारतीय संविधानावर जादूचे प्रयोग सादर केले आहेत, प्रयोगादरम्यान भारतीय संविधान प्रतींचे वाटप मोफत करत आहेत, वीस हजार संविधान प्रती मोफत वाटप केले आहेत.' सत्य संविधान 'या संविधान दिन  विशेषांकाचे एक हजार प्रतींचे वाटप निःशुल्क करण्यात येत आहे. संविधान प्रचारसाठी त्यांनी बांधिलकी नावाने सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून भारतीय संविधान प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन  कास्टट्राईब शिक्षक संघटनेने त्यांना 'संविधान रक्षक'पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
साविंधान जनजागृती अभियान राबवणारे पत्रकार महेंद्र सोनावणे यांना 'संविधान रक्षक'पुरस्कार साविंधान जनजागृती अभियान राबवणारे पत्रकार महेंद्र सोनावणे यांना 'संविधान रक्षक'पुरस्कार  Reviewed by News1 Marathi on December 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads