Header AD

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५,३८८ एकूण रुग्ण तर १०७७ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ८७ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ८७  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,३८८ झाली आहे. यामध्ये १४१५ रुग्ण उपचार घेत असून ५२,८९६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२७कल्याण प – ५७डोंबिवली पूर्व ३९डोंबिवली प – १८मांडा टिटवाळा येथील – २, तर मोहना  येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ८ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून९ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

गरिबीचे नाटक करून लग्न करून ती करायची नवाऱ्यांची फसवणूक , भिवंडीत झाला प्रकार उघड

■फसवणूक करणाऱ्या तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... भिवंडी दि. १५ (प्रतिनिधी  )  फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी...

Post AD

home ads