Header AD

मासुंदा तलाव मार्च महिन्यात लोकार्पण करणार खासदार राजन विचारे

 
ठाणे , प्रतिनिधी   :   खासदार राजन विचारे यांनी आज ठाणे शहराच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी दौरा आयोजित केला होता. त्याची सुरुवात मासुंदा तलाव पासून करण्यात आली. त्यावेळी उपायुक्त हेरवाडे साहेब, नौपाडा -उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घुगे, शंकर पाटोळे साहेब, नगर अभियंता रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता पापळकर, कार्यकारी अभियंता रामकृष्ण कोल्हे, मोहन कलाल स्वच्छता निरीक्षक, वृक्ष प्राधिकरणाचे उद्यान निरिक्षक केदार पाटील, प्रदूषण अधिकारी मनिषा प्रधान तसेच मध्य रेल्वेचे  ठाणे इंजीनियरिंग खात्याचे दिलीप कुमार त्याचबरोबर इतर विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम महापालिकेने बनविलेल्या अॅम्पिथेटरची स्वच्छता व सुरक्षा याकडे लक्ष देण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच दिवसातून दोन वेळा याची साफसफाई करण्यात यावी, सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसविण्यात यावेत असे संबंधितांना आदेश दिले. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी अहिल्यादेवी घाटावर कोणती कामे हाती घेण्यात येणार याचा आढावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात केलेल्या कामांच्या देखभालीसाठी  सुरक्षा रक्षकांकरिता बाहेर केबिन घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दरवर्षी पावसाळ्यात तलाव भरुन तलावाचे पाणी शेजारी असलेल्या बाजारपेठ मध्ये घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी अस्तित्वातील गटार तोडून तेथे नवीन मोठे कल्वर्ट बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला या कामाची लवकरच सुरुवात होणार असून वाहतुकीचे नियोजन कशा पद्धतीने होऊ शकेल याबद्दल चर्चा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्याशी केली.
स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅन्डची कामे लवकर मार्गी लावावी तसेच ठाणे महापालिकेने रेल्वेकडे कल्याण व मुंबई दिषेस धोकादायक असलेल्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी दिलेल्या रक्कमचे काम येत्या 10 डिसेंबर व 15 डिसेंबरला सुरू होणार असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. परंतु अद्याप का सुरू झाले याचा जाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गडकरी रंगायतन येथे बोलवून घेऊन विचारला असता त्यांनी आठवडाभरात काम सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.
त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी कोलबाड येथे आपल्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानातील रंगमंचाच्या लोकार्पणासाठी बाधित ठरणारी बांधकामे दूर करण्याचे आदेश उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांना देण्यात आले आहे. याची कारवाई उद्यापासून सुरू होईल असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या प्रभागात महिलांच्या रोजगारासाठी नव्याने उभारण्यात आलेली प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे. तसेच शहीद उद्यानातील व मखमली तलाव येथील कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मासुंदा तलाव मार्च महिन्यात लोकार्पण करणार खासदार राजन विचारे मासुंदा तलाव मार्च महिन्यात लोकार्पण करणार खासदार राजन विचारे Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads