सिधिका फूड्सचा सुंदर व नॉन - बासमती तांदूळ ‘सिधी” आता मुंबई मध्ये
मुंबई , प्रतिनिधी : इंडियन अचीव्हर्स अवॉर्ड तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “इमर्जिंग कंपनी” पुरस्कार पटकावल्यानंतर लगेचच सिधिका फूड्स या ISO: 9001:2015 प्रमाणित कंपनीने तांदूळ विभागातील आपले नॉन-बासमती उत्पादन मुंबई मध्ये लाँच केले आहे. “सिधी” या ब्रॅण्डनेमखाली रिटेल विक्री करणाऱ्या कंपनीने नॉन-बासमती वर्गातील तांदळाचे काही प्रकार बाजारात आणले आहेत.सिधी कोलम हा मुलायमचव, दर्जा व उत्तम पोताचा तांदूळ,सांबर भात किंवा रसम भात किंवा दही भातासाठी अगदी योग्य असलेला सिधी सोना मसूरी आणि सिधी जिरा राइस हा गोड सर सुवास असलेला सुंदर आणि पटकन शिजणारा तांदूळ तत्काळ ग्राहकांची मने जिंकतील असे आहेत! या तांदळांच्या किंमती वाजवी आहेत आणि मुंबई, ठाणे, डोंबिवली, मीरा रोड - भाईंदर, वसई, विरार, पालघर, बोईसर - तारापूर, नवी मुंबई व पनवेल येथे त्यांची रिटेल विक्री सुरू झाली आहे.
या ब्रॅण्डच्या उपलब्धतेचे तपशील देताना सिधिका फूड्सचे संचालक श्री. उदय नायक यावेळी म्हणाले , “आमची उत्पादने सध्या पुणे, पिंपरी - चिंचवड येथे उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र व कर्नाटक, हैद्राबाद व तामिळनाडूतील प्रमुख शहरांतही उपलब्ध आहेत. ब्रॅण्ड सिधीने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला आहे आणि आता भारतभर, विशेषत: दक्षिण भारतात, कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी आम्ही आक्रमक अभियान हाती घेतले आहे.
सिधिका फूड्सचे संचालक श्री. उदय नायक यावेळी म्हणाले, “एक प्रमुख अन्न म्हणून भाताच्या स्थानाला, त्याचे आरोग्याला होणारे लाभ बघता, क्वचितच आव्हान दिले जाईल. याशिवाय, भात सगळ्या प्रसंगांना सर्वांना आवडतो, भाताचा आस्वाद कायमच घेतला जातो. अस्सल व चवदार भात देऊ करणेया एकमेव उद्दिष्टाने सिधिका फूड्स प्रेरित आहे. ग्राहकांना नॉन-बासमती तांदळांचे आरोग्याला असलेले लाभलक्षात आल्यामुळे आणि या तांदळाचा सुवास, चव व तंतूमयता यां मुळेनॉन-बासमती वर्गातील तांदळाचाविभाग मोठ्यावाढीसाठी सज्ज आहे.
आज आपण सगळेच व्यग्र आयुष्य जगतो आणि तंतूमय घटक नसलेले अन्नखातो. म्हणूनच आपल्या अत्यावश्यक पोषके मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात आरोग्यकारक भाताचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तांदळामध्ये नवोन्मेषकारी प्रयोगांना खूपवाव आहे, उदाहरणार्थ, चवदार पुलाव, आनंददायी डिझर्ट्स, स्वादिष्टनमकीन किंवा तोंडाला पाणी सुटेल असे स्नॅक्स तांदळापासून तयार केले जाऊ शकतात. आमचा ब्रॅण्ड आघाडीच्या उत्पादकांकडून उत्पादने खरेदी करतो. ही उत्पादने पोषक असतात, आवश्यक तेवढा वेळ देऊन परिपक्व केलेली असतात आणि त्यांची चव व सुगंध परिपूर्ण असतात.”

Post a Comment