Header AD

भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा!




ठाणे,  प्रतिनिधी  :  उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने  नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने तसेच जेष्ठ आमदार संजय केळकर व अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. 




" जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा "


काेराेनाच्या पाश्वभूमीवर जेष्ठांनाही शारीरिक सुदृढता राखण्याबरोबरच त्यांचे मानसिक धैर्य ,आरोग्यही आपणास उंचवायचे आहे आणि त्यासाठी हा छोटासा प्रयास. यामध्ये  या जेष्ठांचा यशोचित सन्मान, तसेच विविध सुविधा देणारे " जेष्ठ नागरिक कार्ड ", त्यासाेबतच वाफ घेण्यासाठी स्टीमर व मास्क यांचे वाटप करण्यात आले. 


तसेच काेराेना लढ्यात समर्थपणे भाग घेणार्या काेराेना याेद्ध्या़ंचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास भाजपा प्रदेश उपाध्यक्षा माधवीताई नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश माेरे, नगरसेवक सुनेश जाेशी, ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र दिघे व शहर उपाध्यक्ष डाँ राजेश मढवी हे उपस्थित हाेते.


भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा! भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा! Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads