Header AD

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तृतीयपंथी समाज सेवकांचा सन्मान

  

ठाणे , प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने तृतीयपंथी समाजातील समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. एल. जी. बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नविन सेल सुरू केला असून यामाध्यमातून तृतीयपंथी समाजाच्या समस्या सोडवण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत स्वत:ला माणुस म्हणून समाजात स्थान मिळवू पाहणाऱ्या तृतीयपंथियांना इतरांप्रमाणे मान- सन्मान मिळवा या हेतूने  " सन्मान माणुसकीचा"  या अंतर्गत तृतीयपंथी समाजातील कामिनी घोडके,लकी तुपे,सोनू शिंदे,काजल खारकर,मयुरी कसले, दिव्या तांबे,सिया खानोळकर आदी  समाजसेवकांचा सन्मान गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती कॅाग्रेसच्या वतीने व राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्या पुढाकाराने शुक्रवारी करण्यात आला .


या कार्यक्रमाला ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे,संघर्षच्या महिला अध्यक्षा ऋता आव्हाड,ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुजाता घाग,राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा पल्लवी जगताप,राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे शहरध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षा पुजा शिंदे,मुंब्रा ब्लॅाक अध्यक्षा पुजा दामले,माजिवाडा-घोडबंदर ब्लॅाक कार्याध्यक्षा श्रद्धा चव्हाण,सावरकर नगर ब्लॅाक कार्याध्यक्षा सुप्रिया ठाकुर,संजय नगर वॅार्ड अध्यक्षा सिमा बडदे,प्र.क्र.32 वॅार्ड अध्यक्षा समिरा सय्यद,प्र.क्र.33 वॅार्ड अध्यक्षा तमन्ना अशरफी,कोपरी ब्लॅाक अध्यक्षा श्रुती पुरकर आदींनी मेहनत घेतली.


या कार्यक्रमात पक्षसंघटन मजबूत करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या यामध्ये वार्ड ३२ कार्याध्यक्षपदी स्नेहांकिता सावंत,भीमनगर उपाध्यक्षपदी रोहिणी म्हस्के,किस्मत कॉलनी उपाध्यक्षपदी सोनाली सोनावणे,भीमनगर चिटणीसपदी अश्विनी भालेराव,भीमनगर वार्ड अध्यक्षपदी अर्चना सिंग,महात्मा फुलेनगर वार्ड  अध्यक्षपदी सुजाता कांबळे,दारुल फलाह विभाग उपाध्यक्षपदी मिस्बाह खान आदींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तृतीयपंथी समाज सेवकांचा सन्मान शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तृतीयपंथी समाज सेवकांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads