Header AD

महापरिनिर्वाण दिना निमित्‍त केडीएमसी तर्फे बाबासाहेबांन अभिवादन



कल्‍याण , कुणाल  म्हात्रे   :  भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या  महा‍परिनिर्वाण दिनानिमित्‍त आज त्‍यांना कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्‍यात आली.कल्‍याण (प) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पूर्णाकृती पुतळयास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्‍पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 


त्‍याचप्रमाणे महापालिका मुख्‍यालयातही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस   पुष्‍पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी  अतिरिक्त आयुक्त  सुनील पवार, कार्यकारी अभियंता यशवंत सोनावणे, महापालिका सचिव संजय जाधव, उपआयुक्‍त उमाकांत गायकवाड, माजी महापौर रमेश जाधव, सहा. आयुक्‍त अरुण वानखेडे, त्‍याचप्रमाणे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

महापरिनिर्वाण दिना निमित्‍त केडीएमसी तर्फे बाबासाहेबांन अभिवादन महापरिनिर्वाण दिना निमित्‍त केडीएमसी तर्फे बाबासाहेबांन अभिवादन Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

  ◆५९ , ३४२  एकूण रुग्ण तर ११ २३  जणांचा आतापर्यंत मृत्यू   तर २४ तासांत   १३६  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण...

Post AD

home ads