Header AD

कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच

 

■त्वरित नुकसानभरपाई मिळण्याची भाजपा महिला जिल्हाध्यक्षांची मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  २०१९ साली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या पूरग्रस्त नागरिकांना अद्यापही शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नसून या नागरिकांना हि नुकसानभरपाई त्वरित मिळण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


दि. २५ व २६ जुलै आणि ३ व ४ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होवुन ठाणे जिल्हयातील कल्याण पुर्व शहरात मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने गोर गरीबांचे सर्व समान्यांचे तसेच सर्व घरातील भांडी - कुंडी ही पावसाच्या पाण्याबरोबर वाहुन गेल्याने नागरीकांचे संसार उघडयावर आलेले आहेत. नुकसानग्रस्त भागातील अनेक नागरीकांचे तलाठी मार्फत पंचनामे करून देखील अदयाप नुकसानग्रस्तांना नुकसान भरवाईसाठी शासनाकडुन देण्यात येणारी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळालेली नाही. यामुळे नुकसान ग्रस्त नागरीकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.


आजच्या कोरोना विषाणु महामारीच्या काळामध्ये नागरीकांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाकडुन देण्यात येणारी आर्थिक मदत ही नुकसान ग्रस्तांपर्यंत पोहचली तर नागरीकांना तेवढाच दिलासा मिळेल. यापुर्वी देखील स्थानिक नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी विनंती अर्ज केले आहेत. तरी याची दखल घेवुन तातडीने अतिवृष्टी मुळे झालेल्या पुरग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली असल्याची  भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads