Header AD

पेट्रोल दरवाढी विरोधात पेट्रोल पंपा समोर राष्ट्रवादी पदवीधर संघाची निदर्शने





भिवंडी , प्रतिनिधी  :  मागील पंधरा दिवसां पासून पेट्रोल डिझेल दरात दररोज वाढ होत असून पेट्रोल चे दर शंभर रुपये होण्याचे संकेत मिळत असून त्या विरोधात जनसामान्यां मध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आंदोलन निदर्शाने कातून विरोध व्यक्त केला जात आहे .


भिवंडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण नाका येथील पेट्रोल पंपा समोर निदर्शने करण्यात आली या मध्ये पदवीधर संघाच्या शहराध्यक्षा खिलन शहा , पक्षाचे पदाधिकारी अँड सुनील पाटील , शमीम अन्सारी ,अजहर खोजे ,युसूफ सोलापूरकर ,बशीर पठाण ,सुनील पवार ,रसूल खान,शहादत यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .या आंदोलन नंतर पेट्रोल डिझेल दरवाढी चा निषेध करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांना सोपविण्यात आले .
पेट्रोल दरवाढी विरोधात पेट्रोल पंपा समोर राष्ट्रवादी पदवीधर संघाची निदर्शने पेट्रोल दरवाढी विरोधात पेट्रोल पंपा समोर राष्ट्रवादी पदवीधर संघाची निदर्शने Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads