Header AD

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना लोक संख्ये नुसार पाणी पुरवठा गरजेचा खासदार कपिल पाटील यांची स्टेमकडे मागणी


भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईसंदर्भात स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपिन शर्मा यांच्याशी चर्चा करताना भाजपाचे खासदार कपिल पाटील.


भिवंडी, प्रतिनिधी  :   भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना १९७९-८० मधील अंदाजे ३५ हजार लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आता ४० वर्षांत औद्योगिकीकरण व दळणवळणाच्या सोयीनुसार वाढलेल्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा गरजेचा असल्याने पाणीपुरवठ्यात वाढ करावी, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक व ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली.


भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात लोकसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, या गावांना तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येच्या आधारावर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेम प्राधिकरणाच्या बैठकीपूर्वी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. तसेच त्यांचे भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या धोरणानुसार प्रती माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मात्र, भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३४ गावांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावांमधील लोकसंख्या वाढत असून, २०३१ मध्ये अंदाजे १२ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गावनिहाय पाणी आरक्षण वाढविण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाईपलाईनचा व्यास वाढविणे व निकामी झालेल्या पाण्याच्या टाक्या पुन्हा बांधण्याची गरज आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना लोक संख्ये नुसार पाणी पुरवठा गरजेचा खासदार कपिल पाटील यांची स्टेमकडे मागणी भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना लोक संख्ये नुसार पाणी पुरवठा गरजेचा खासदार कपिल पाटील यांची स्टेमकडे मागणी Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads