Header AD

पदपथांवरील अतिक्रमणां विरुध्द कडक कारवाई करणार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय सहज चालता यावे यासाठी महापालिकेने यापुर्वीच पदपथांवरिल फेरीवाल्यांविरुध्द कारवाई सुरु केलेली आहे, त्याचप्रमाणे रस्त्यालगतची भंगार बेवारस वाहने उचलण्याबाबतही महापालिकेने मोठी मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे आता पदपथांवर अतिक्रमण करणा-या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस अधिकारी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी, एम.सी.एच.आय. पदाधिकारी यांचे समवेत संपन्न झालेल्या मोबिलीटी कमिटीच्या बैठकीत दिली.


या बैठकीत वाहतूक विभागाचे उप आयुक्त यांनी महापालिका परिसरात कुठे साईन बोर्ड लावावेतपार्कींगची व्यवस्था कशी असावी याबाबत उपयुक्त सुचना केल्या. त्यानुसार महापालिका लवकरच साईन बोर्ड लावण्याची व्यवस्था करणार आहेपार्कींगसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत विचार केला जाईलतसेच पी-१पी-२ च्या पार्कींग व्यवस्था करण्यासाठी दुभाजक काढणेबाबत वाहतूक विभागाकडून प्राप्त सूचनांचा विचार केला जाईल असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


 वाहन तळावर जमा केलेल्या बेवारस वाहनांचे ई ऑक्‍शन करणेरिफ्लेक्टेड जॅकेट वाहतूक पोलिसांना पुरविणेचुकीच्या ठिकाणी पार्कींग केलेल्या गाडयांना जॅमर लावणेअनावश्यक ठिकाणी असणारे दुभाजक काढणेत्याचप्रमाणे काही रस्ते केवळ पादचा-यांना चालण्यासाठी मोकळे ठेवणे इ. विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेने ७ ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली असून ते सिग्नल तोडल्यास संबंधितांना ई-चलान देण्याची व्यवस्था १५ दिवसांत करण्याचा प्रयत्न असल्याबाबतची माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.


या बैठकीस अति. आयुक्त सुनिल पवारशहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली)वाहतूक पोलिस उपआयुक्त बाळासाहेब पाटीलसहा.आयुक्त पोलिस अनिल पोवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, ‍ अन्य पोलिस अधिकारीमहापालिका अधिकारीआरटीओचे प्रतिनिधीवास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारीएम.सी.एच.आय. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पदपथांवरील अतिक्रमणां विरुध्द कडक कारवाई करणार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पदपथांवरील अतिक्रमणां विरुध्द कडक कारवाई करणार  पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads