Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार पार १२३ नवे रुग्ण तर १ मृत्यू


■५६,०३९ एकूण रुग्ण तर १०८४ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११५ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार पार गेली असून आज नव्या १२३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १२३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,०३९ झाली आहे. यामध्ये १२३२ रुग्ण उपचार घेत असून ५,७२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१९कल्याण प – ५२डोंबिवली पूर्व २७डोंबिवली प – १३मांडा टिटवाळा – ५, मोहना – ६, तर पिसवली येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून९ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार पार १२३ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार पार १२३ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

क्विक हिलने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये मजबूत वृद्धी नोंदवली

मुंबई, १८ मे २०२१ :  क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेड (क्विक हिल), भारतातील ग्राहक, बिझनेस, सरकारसाठी सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन सोल्...

Post AD

home ads