भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांची एमएमआरडीएच्या समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड
भिवंडी , प्रतिनिधी : स्थानिक विकास कामांना प्राधान्य मिळावे यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील लोकप्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात येते. त्यानुसार या एमएमआर प्रदेशातील रोटेशन पद्धतीने पुढील दोन वर्षांकरिता भिवंडी शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांची मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे लेखी पत्र महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी भिवंडीच्या महापौर प्रतिभा विलास पाटील यांना देऊन तसे कळवले आहे.
त्यांची एमएमआरडीए प्राधिकरणावर झाल्याने २डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत सर्व सदस्यांनी महापौर प्रतिभा विलास पाटील यांचे अभिनंदन केले आहे.तसेच शहराच्या महापौर प्रतिभा पाटील यांच्या या नियुक्तीमुळे शहरातील एमएमआरडीए कडील उर्वरित सर्व विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा यावेळी उपमहापौर इम्रान वली मोह.खान, सभागृह नेते विलास आर.पाटील, स्थायी समिती सभापती हालीम अन्सारी,ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी ,निलेश चौधरी,विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे आदींसह सर्व पक्षीय गटनेत्यांनी महापौर प्रतिभा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांची एमएमआरडीएच्या समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड
Reviewed by News1 Marathi
on
December 03, 2020
Rating:

Post a Comment