आमदार संजय केळकर यांच्याकडून रिक्षावाल्यांना मदतीचा हात
ठाणे , प्रतिनिधी : कोरोना काळात सर्व काही बंद असल्यामुळे रिक्षावाले सुद्धा बेरोजगार झाले होते. या रिक्षावाल्यांचा रोजगार कित्येक महिने बंद होता आणि अजून सुद्धा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे चालू झाला नाही. बऱ्याच जणांच्या रिक्षा या कर्ज काढून घेतलेल्या होत्या शिवाय घर चालवण्यासाठी रोजचा खर्च यामुळे या सर्व रिक्षावाल्यांना पैशांची चणचण जाणवत होती. ही त्यांची अडचण ओळखून आमदार संजय केळकर यांनी टीजेएसबी बँक मॅनेजमेंट शी बोलून रिक्षावाल्याना विनातारण पन्नास हजार रुपये पर्यंत कर्जाची सोय करून दिली.
आज काही रिक्षावाला प्रत्यक्षात कर्ज मिळाले. यावेळी आमदार संजय केळकर यांनी या सर्व रिक्षावाल्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व रिक्षावाल्यानी आमदार संजय केळकर यांचे धन्यवाद व्यक्त केले. सर्व रिक्षावाल्यांचे कर्ज मिळण्यासाठी असंघटित कामगारांसाठी काम करणारे श्री दत्ता घाडगे चिटणीस भाजपा ठाणे शहर यांनी पाठपुरावा केला त्याबद्दल सर्व लोकांनी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले.या रीक्षावाल्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात मनोहर औताडे,गोविंद बाबर,महेश औताडे,लक्ष्मण गिड्डे,सुनील पाटील,बबन जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment