Header AD

भिवंडीतील जंगलात आढळले सडलेल्या अवस्थेत चौघांचे मृतदेह


आईसह तीन मुलांचे मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने परिसरात खळबळ; तर वडिलांसह दुसऱ्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न...


भिवंडी ,  प्रतिनिधी  :  20 ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह उंबरखांड येथील घनदाट निर्जन जंगलातील एका झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याची घटना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उबंरखांड पाच्छापूर जंगलातील आवळ्याची कपारी या डोंगरवर घडली आहे.


दोन महिन्या नंतर गुरुवारी हि घटना समोर आल्याने या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी आपल्या दुसऱ्या पत्नीसह  तेथेच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेेत. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अश्याच प्रकारे झाडाला सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत हे चारही माय - लेकांचे मृतदेह आढळून आल्याने याप्रकरणी पडघा पोलीस सखोल तपास करीत आहत.


श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तर त्याची मयत पत्नी रंजना (वय ३०) , मयत मुलगी दर्शना (वय, १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र संशयास्पद आणि भयंकर अश्या घटनेच्या तपासाचे पडघा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस उप अधीक्षक दिलीप गोडबोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके हे घटनेवर लक्ष ठेवून आहेत .


भिवंडी तालुक्यातील उंबरखांड गावातील श्रीपत यांनी 21 ऑक्टोंबरला चौघेही माय - लेक बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ संतोष पत्नी सह आवळ्याची कपारी या डोंगरवरील जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला त्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .या मृतदेहाच्या अंगावरील कपड्यामुळे मृतदेहांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यांनतर पत्नी आणि 3 मुलांच्या मृत्यूंची बातमी मिळताच श्रीपतने स्वतः सह दुसऱ्या पत्नीने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकुर्ती अत्यवस्थ असल्याचे समजते.

          
दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा  पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून फॉंरेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. मात्र दोन महिन्यापासून चौघांचे मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पडघा पोलीस सखोल तपास करीत आहेत. सदर चे घटनास्थळ अत्यंत दाटीवाटी च्या आवळ्याची कपारी या डोंगरवर झाडाला गळफास घेण्या साठी गेली कशी या बाबत सर्वत्र चर्चा सुरू असून घटनास्थळी पोहचणे पोलिसांना सुध्दा अवघड होऊन बसले होते .दरम्यान रंजना हिचे दोन वर्षां पूर्वी गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया केल्याने तिला अवघड काम करता येत नसल्याने पती ने ओळखीच्या दुसऱ्या विधवा महिला सोबत विवाह केला होता .त्यावरून दोघां मध्ये वाद होत असताना रंजना हिने हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे .
भिवंडीतील जंगलात आढळले सडलेल्या अवस्थेत चौघांचे मृतदेह भिवंडीतील जंगलात आढळले सडलेल्या अवस्थेत चौघांचे मृतदेह Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads