Header AD

चालु वर्षात २९ डिसेंबर अखेर २८५ कोटी ९६ लक्ष रू. मालमत्ता करापोटी मनपा तिजोरीत जमा

   

                           
अभय योजनेला उत्तम प्रतिसाद मालमत्ता थकबाकी करांची विक्रमी वसुली..

  

कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली मनपाच्या अभय योजनेला शेवटच्या  दोन शिल्लक असताना सोमवार आणि मंगळवार दोन दिवसात तब्बल मालमत्ता थकबाकी करापोटी ३६कोटी ४४लाख रूपये भरणा झाल्याने  अभय योजना सुरू झाल्यापासून तब्बल १४९कोटी ६लाख  रुपयाचा भरणा मनपाच्या तिजोरीत जमा झाले.        कल्याण डोंबिवली मनपाने १एप्रिल २०२० ते २९ डिसेंबर २०२० पर्यंत २८५कोटी ९६लक्ष रू मनपा तिजोरीत मालमत्ता कराच्या पोटी जमा करीत विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. 

                     
    गत ९ महिन्यात कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या करदात्यांना कर भरणे सोपे व्हावे याकरिता महापालिकेने १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत " अभय योजना-२०२०” लागू केली. १५ ऑक्टोबर ते २९ डिसेंबर या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी रु. १४९  कोटी ०६ लक्ष इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत भरणा केलेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २१२ रु कोटी इतकी रक्कम महापालिकेकडे मालमत्ता करापोटी जमा झाली होती. अशी माहिती करनिरर्धाक संकल्क विनय कुलकर्णी यांनी दिली.


         अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर,२०२० पर्यंतच आहे. या योजनेमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्‍कमी भरल्यास, ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. अभय योजनेस मुदत वाढ देण्यात येणार नसल्याने सर्व थकीत करदात्यांनी आपल्या मालमत्ता कराची रक्कम ३१ डिसेंबर,२०२० किंवा त्यापूर्वी जमा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.        

                       
          अभय योजनेला मुद्दतवाढ करावी अशी मागणी कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर, कल्याणपूर्व आमदार गणपत गायकवाड,  कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील यांनी केली असल्याने अभय योजनेला आयुक्त  मुद्दतवाढ देणार का  हे चित्र ३१डिसेंबर २०२० नंतर समजेल
चालु वर्षात २९ डिसेंबर अखेर २८५ कोटी ९६ लक्ष रू. मालमत्ता करापोटी मनपा तिजोरीत जमा चालु वर्षात २९ डिसेंबर अखेर २८५ कोटी ९६ लक्ष रू. मालमत्ता करापोटी  मनपा तिजोरीत जमा   Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads