Header AD

भिवंडी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील ५ गुन्हेगारांना अटक लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

 भिवंडी ,  प्रतिनिधी   :  लॉक डाऊन  काळात भिवंडी शहरात गुन्हेगारांनी  थैमान  घातल्याचे विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून आले आहे. अश्या गुन्हेगारी कारवाईच्या पार्शवभूमीवर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  मोबाईल, चैन स्नेचिंग, घरफोडी, दुचाक्या  आणि अमली पदार्थाची विकी  करणाऱ्या ५ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. अली अकबर उर्फ जागु निसार हुसेन इराणी जाफरी (वय २१  रा.पिराणीपाडा, भिवंडी)  अतिक अहमद जुबेर अहमद अंसारी (वय २२  रा. रेहमतपुरा, भिवंडी)  मोहमद नदीम सौजुद्यीन कुरेशी (वय २० रा.  गायत्रीनगर भिवंडी)  कमाल अहमद निहाल अहमद अंसारी (वय ३४ रा.  न्यु आझाद नगर भिवंडी)   मोहमंद अफजल मोहमद आयुब वारसी (वय २४, रा.  चौधरी कम्पाउड शातीनगर भिवडी) असे मुसक्या  आवळलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्हेगारांनाकडून १२ दुचाक्या, घरफोडी गुन्ह्यातील दागिने, मोबाईल , आणि अमलीपदार्थसह  तलवार सह एक गावठी कट्टा आणि काडतूसे असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

लॉक डाऊन  काळात गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ


परिमंडळ २ च्या हद्दीत अनलॉक काळात गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत झाल्याने या  गुन्हयांना आळा घालून गुन्हे उपडकीस आणण्यासाठी  पोलीस उपायुक्त  योगेश चव्हाण यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हददीत सतर्क गस्त करून असे गुन्हे करणारे गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुर्व विगागचे  सहा. पोलीस आयुक्त  प्रशात ढोले,  पश्चिम विभागचे   सहा. पोलीस आयुक्त किसन गावीत , शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक  शितल राउत याचे मार्गदर्शनाप्रमाणे शांतीनगर पोलीस ठाणे हददीत तपास पथकाचे पोलीस उपनिरक्षिकं जाधव,  पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी  गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून  जबरी चोरी, सोनसाखळी,  मोटारसायकल चोरी, घरफोडी, गांजा तस्करी करणारे असे  ५ गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक केली आहे. 

 

 गंभीर गन्हे उघड  करण्यात पोलिसांना यश 


जबरी चोरीची तयारी १ गुन्हा, जबरी चोरी १  मोटार सायकल चोरीचे १२ गुन्हे, तसेच भिवंडी शहरा मधुन हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीकडून घरफोडीचा एक  गुन्हे उघडकीस आणले. तर पोलीस निरिक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे गांजा ( अमली पदार्थ) विकी करणारा एक गुन्हेगार  तलवारसह अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी शांतीनगर पोलीस ठाण्याचे १ जबरी चोरीची तयारी, १ जबरी चोरी, ६ मोटार सायकल चोरीचे.१ घरफोडी, गांजांची तस्करी करणारे विरोधात १ गुन्हा असे  १० गुन्हे, त्याव्यतिरिक्त भिवंडी शहर पोलीस ठाणे कडील ३, कोळशेवाडी,बाजारपेठ व पायधुनी पोलीस ठाणे कडील प्रत्येकी १ असे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.या गुन्हेगारांकडून जबरी चोरीच्या प्रयत्नात वापरण्यात आलेले १६,हजार रुपयाचा एक गावठी कट्टा , दोन जिवत काडतुस, जबरी चोरी केलेला १२, हजार ९९० रुपयांचा मोबाईल, घरफोडी मधीला १५ ग्रॅम वजनाची ३० हजार किंमतीची  सोन्याची  चैन, आणखी एका गुन्हेगारकडून  १२ मोटारसायकल,  १ किलो ७३० ग्रॅम वजनाचा गांजा व एक लोखंडी तलवार आशा प्रकारे  ६ लाखांचा  मुद्येमाल पाचही आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. 


भिवंडी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील ५ गुन्हेगारांना अटक लाखोंचा मुद्देमाल हस्तगत भिवंडी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील ५ गुन्हेगारांना अटक लाखोंचा मुद्देमाल हस्तगत Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads