बेकायदा चार मजली इमारत बांधकाम प्रकरणी जागे मालकासह कुटुंबावर गुन्हा
भिवंडी , प्रतिनिधी : नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भिवंडी निजामपूर महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा चार मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने जागे मालकासह कुटंबाबर शांतीनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुर्तुजा गुलाम मोह. मोमीन (जागे मालक) श्रीमती रेहाना गुलाम मोमीन, जैद इकबाल मोमीन आणि इकबाल गुलाम मुस्तफा मोमीन (सर्व रा. नवीन कणेरी, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
गेल्या वर्षीच्या जून महिन्यात उभी केली होती बेकायदा इमारत
जागे मालक मुर्तुजा मोमीन यांनी शहरातील नवीन कणेरी, गैबीनगर परिसरातील त्यांच्या ३८ x ४० जागेत चौरस फुटाचे तळ मजला अधिक चार मजल्याचे नवीन बांधकाम गेल्या वर्षीच्या जून मंहिन्यात केले आहे. हे बांधकाम करताना त्याने पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी जागे मालक मुर्तुजा मोमीनसह त्याच्या कुटुंबातील ३ जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९५२ चे कलम ५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
लॉकडाऊन काळात शहरात अनधिकृत बांधकामे पेव ?
कॉलडाऊन काळात सर्वच शासकीय यंत्रणा कोरोनामुळे व्यस्त होत्या. याचाच फायदा शहरातील भूमाफियांनी उचलून शेकडो अनधिकृत बांधकामे उभी केल्याचे सांगण्यात आले आहे. आता महापालिका क्षेत्र कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याने पालिका प्रशासनाने अश्या अनधिकृत बाधंकामचा शोध घेऊन कारवाईची मागणी शहरातील दक्ष नागरिकांनी केली आहे.

Post a Comment