भिवंडीत कत्तलीसाठी चार चाकी गाडीतून गायींची चोरटी वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे गायींना मिळाले जीवनदान
भिवंडी , प्रतिनिधी : राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चार चाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गायीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत असतांनाच शहरातील शेलार नदी नाका येथे चार चाकी वाहनातून चक्क जिवंत गायीची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी समोर आला आहे . विशेष म्हणजे गाडीचे नंबर प्लेट बदलून या गायी बाहेरून विकत आणल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे . दरम्यान तालुका पोलिसांच्या सतर्कतेने वाहनातील तीन गायींना जीवनदान मिळाले असून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली असून वाहन चालकासह एकूण पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलार नदी नाका परिसरात तालुका पोलिसांनी ऑल आऊट मोहीम राबवून नाका बंदी केली असता या नाका बंदीत टवेरा कंपनीची सफेद रंगाची गाडी अडवली असता गाडीतील इसमांनी गाडीतून त्वरित उद्या मारून पलायन केले असता पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता या गाडीतील मागच्या बाजूच्या सीट मध्ये फेरबदल करून तीन जिवंत गायी आढळल्या . या गायींमध्ये १० हजर रुपये किंमतीची पाच वर्षाची एक गीर जातीची गाय , एक दहा हजार रुपये किंमतीची जर्सी गीर क्रॉस जातीची ३ वर्ष वयाची गाय तसेच एक १२ हजार रुपये रक्कमेची चार वर्ष गावठी गीर गाय अशा एकूण ३२ हजार रुपये किंमतीच्या तीन जिवंत गायी आढळल्या. पोलिसांनी सदर गाडी जप्त करून शेलार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून स्थानिकांच्या मदतीने गायीची सुटका केली
दरम्यान गाडीतील पाचही जण बाजूला असलेल्या झोपड्पट्टीकडे पळून गेले . याप्रकरणी अब्दुल्ला मौला शेख ( रा . नवी वस्ती ) गुड्डू , नदीम , जमील , तसेच गाडी मालक अशा पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय राजेंद्र बेरे यांनी गुन्हा दाखल केला असून तालुका पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत . दरम्यान जप्त केलेल्या गाडीतून तीन मोबाईल फोन तसेच अब्दुल्ला मौला शेख याचे वाहन परवाना तसेच पॅन कार्ड व मतदार कार्ड व इतर ओळखपत्र तसेच वेगवेगळ्या गाडी नंबरच्या चार नंबर प्लेट व इंजेक्शन , दगडांनी भरलेली थैली , स्टीलचे रॉड असे साहित्य पोलिसांनी जप्त केली असून त्यानुषंगाने तालुका पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत .
भिवंडीत कत्तलीसाठी चार चाकी गाडीतून गायींची चोरटी वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे गायींना मिळाले जीवनदान
Reviewed by News1 Marathi
on
December 02, 2020
Rating:

Post a Comment