Header AD

क्रीडा संकुलात मैदानी व्यायाम व मॉर्निंग वॉक सुरू करा मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांची मागणी

 

डोंबिवली , शंकर जाधव   :  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून डोंबिवलीतील क्रीडा संकुल बंद आहे. वर्षभरापूर्वी क्रीडा संकुल मधील जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्ती कामाला आमदार निधीतून सुरुवात झाली होती. परंतु सदर जॉगिंग ट्रॅक हा लॉकडाऊन आधी,नंतर व अद्याप सुद्धा दुरुस्तीमुळे  तसेच अर्धवट काम ठेवण्यात आलेला आहे.  क्रीडासंकुलातील आवारात असलेल्या बंदिस्त कै. वाजपेयी सभागृहात महापालिकेचे कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण क्रीडासंकुलाती व्यायाम शाळा,तरणतलाव हे इतर प्रकारांवर अनेक महिन्यांपासून बंदी करण्यात आलेली आहे. या वास्तूंवर  महापालिकेचे करोडो रुपये खर्च झालेले आहेपरंतु  देखरेख न केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक व क्रीडाप्रेमी व खेळाडूंचे अतोनात नुकसान होते. म्हणून क्रीडा संकुला मैदानी व्यायाम व मॉर्निंग वॉक सुरू करावे अशी मागणी मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.  क्रीडा संकुलातील मैदान व कोविड सेंटरची इमारत ह्यात बरेच अंतर आहे. लॉकडाउन संपवून अनलॉक होऊन आता दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. आता  राज्य सरकारने सर्व मैदानी व्यायाम प्रकारांवर घातलेली बंदी उठवलेली आहे. डोंबिवलीकर सकाळच्या जॉगिंग व मॉर्निंग वॉकसाठी तसेही जागा व मोकळी मैदाने कमी असल्यामुळे नागरिक वाहतुक सुरू असलेल्या रस्त्यांवर चालत असतातसकाळी व्यायाम करायला घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना या दुरुस्तीला काढलेल्या रस्त्यांवरून चालताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. वाहनांच्या प्रदूषणाचा व रस्त्यातील धूळ इत्यादीचा प्रचंड त्रास होत असतो. क्रीडा संकुल कोविड सेंटरला लागूनच असलेल्या इमारतीमधील सर्व व्यापारी गाळे सुरू आहेत. सायंकाळी या रस्त्यावर खाद्य जत्रा भरते.  फेरीवाल्यांच्या हातगाड्या,-ठेले तेथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महापालिका कोविड सेंटरचा जवळ असणाऱ्या ह्या सर्वाला परवानगी असेल तर कोविड सेंटर पासून लांब असणाऱ्या मैदानाला  सुद्धा परवानगी देऊन ते सुरू करावेत्यासाठी क्रीडा संकुलला दोन मुख्य गेट आहे.त्यातील मागील रस्त्या वरील गेटमधून सध्या कोविंड सेंटरकडे जाण्यासाठी रस्ता देण्यात आलेले आहे. कोविङ सेंटरसाठी पुढील गेटचा वापर सुरू केला तर मागील गेट हे क्रीडासंकुलातील मैदानासाठी वापर करता येऊ शकते.मैदान व कोविड सेंटर ह्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कुंपण घातले तर क्रीडा संकुल मैदानाचा वापर सुद्धा नागरिकांना सुरू करण्यात येऊ शकतो.क्रीडा संकुला मधील अर्धवट अवस्थेत आमदार निधीतून होणारा जॉगिंग ट्रॅक कामाचे लवकरात लवकर दुरुस्ती करुन पूर्ण  केल्यास नागरिकांना या क्रीडा संकुल मैदानाचा वापर करावयास मिळेल.सध्या फक्त पहाटे ५ ते सकाळी १० अशा आरक्षित व तात्पुरत्या स्वरूपातील वेळेत मैदानी व्यायामाला क्रीडासंकुलासाठी परवानगी दिली तर शारीरिक व्यायाम व स्वास्थ्य राखण्यासाठी डोंबिवलीकर क्रीडाप्रेमी नागरिकांना त्याचा फायदा होईल.पालिका आयुक्त डॉ, विजय सूर्यवंश ज्यांच्या निधीमुळे क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे ते आमदार रविंद्र  चव्हाण व आमदार निधीतून असलेले क्रीडा संकुल मधील जॉगिंग ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करून सदर क्रीडा संकुल सध्यातरी तात्पुरत्या स्वरूपात पहाटे ५ ते सकाळी १० या आरक्षित वेळेत सुरू करावे व क्रीडाप्रेमी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.

क्रीडा संकुलात मैदानी व्यायाम व मॉर्निंग वॉक सुरू करा मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांची मागणी क्रीडा संकुलात मैदानी व्यायाम व मॉर्निंग वॉक सुरू करा मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांची मागणी Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads