Header AD

भिवंडीत बीएनएन कॉलेज रोडवरील अनधिकृत खाजगी बस पार्किंगचा नागरीकांना नाहक त्रास
भिवंडी , प्रतिनिधी   :   भिवंडी शहरातील धामणकर नाका ते कॉलेजरोड या नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर मागील पाच ते सहा महिन्यांपासून  किमान चार ते पाच खाजगी प्रवासी बस अनधिकृतपणे दिवसरात्र उभ्या करून ठेवल्या जात आहेत.त्यामुळे या ठिकाणी वाहन चालक व प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.असा आरोप भाजपा भिवंडी शहर सरचिटणीस विशाल पाठारे यांनी पोलीस व महानगरपालिका प्रशासनास दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे .


या बस एकाच ठिकाणी स्वतः च्या मालकीची पार्किंग जागा असल्याच्या अविर्भावात उभ्या करून ठेवल्याने या ठिकाणी साफसफाई करण्यास अडचण येत असून या भागात अस्वच्छता पसरून दुर्गंधीचा सामना स्थानिक निवासी नागरीकांना करावा लागत आहे. या अवैध बस पार्किंगमुळे येथील नागरीक संतप्त झाले असून या रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालक ,मालकांवर योग्य ती कारवाई करून या ठिकाणाहून त्या त्वरित हटवण्यात याव्यात अशी मागणी विशाल पाठारे यांनी केली आहे.


याबाबत येत्या सात दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास त्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल त्यावेळी व  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन राहील असा इशारा देखील विशाल पाठारे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे
भिवंडीत बीएनएन कॉलेज रोडवरील अनधिकृत खाजगी बस पार्किंगचा नागरीकांना नाहक त्रास भिवंडीत बीएनएन कॉलेज रोडवरील अनधिकृत खाजगी बस पार्किंगचा नागरीकांना नाहक त्रास Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२५ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ५२८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   २२५  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ ता...

Post AD

home ads