Header AD

गोरसई -सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा हभप गजानन केणे यांचे दुःखद निधन

  
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्यातील तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायत गोरसई - सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा ह.भ.प.गजानन पदू केणे (७४)यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वैकुंठवासी केणे यांनी गोरसई - सावंदे ग्रामपंचायतीचे १९८५ ते १९९५ असे दहा वर्षे बिनविरोध सरपंचपद भूषवले होते.त्या कार्यकाळात त्यांनी दोन्ही गावचा चांगला करभार व विकास करण्यात हातभार लावला होता.


वैकुंठवासी ह.भ.प.तथा माजी सरपंच गजानन केणे यांनी गोरसई गावात ३७ वर्षांपासून सुरू असलेला अखंड हरीनाम सप्ताह चालू करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.ते गेले तीस वर्षे गावातील मालकरी महिला मंडळासोबत पंढरपुर,आळंदी,नेवासा,तुंगारेश्वर, त्र्यंबकेश्वर,गणेशपूरी वारीमध्ये नित्यनियमाने सहभागी होत असत.ते खूपच सत्यवादी विचाराचे होते.त्यांच्या स्वर्गवासाने गोरसई गावातील वारकरी संप्रदायाची  खूपच हानी झाल्याने शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख कल्पेश केणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
गोरसई -सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा हभप गजानन केणे यांचे दुःखद निधन गोरसई -सावंदे ग्रा.पं.माजी सरपंच तथा हभप गजानन केणे यांचे दुःखद निधन Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads