Header AD

कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना शिवसेनेच्या मेळाव्यातून मिळाला रोजगार परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोरोनामुळे नोकरी गेलेल्या ३५० जणांना शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळाला असून परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी कचोरे पत्रीपूल याठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.  


कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी आणि प्रभाग क्र. ४५ कचोरे शिवसेना शाखेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये २५ ते ३० कंपन्यांचा समावेश होता. बॅक ऑफिसएचडीएफसी बँक, बीपीओ, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आयसीआयसीआय बँकएलआयसीगोदरेजरिलायन्ससिक्युरिटी गार्ड आदी नामांकित  कंपन्यांमध्ये बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून केंद्र सरकारने कलम १४४ लावून भारत देशात  लॉकडाऊन केल्याने यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे वाढती बेरोजगारी आणि या बेरोजगारांचा हाताला काम मिळावे या हेतून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये ६०० जणांनी नोकरीसाठी अर्ज केले, त्यापैकी ३५० जणांना रोजगार मिळाला असल्याचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक रमेश जाधव, विधानसभा विधानसभा संपर्कप्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पलांडे, परिवहन सदस्य बंडू पाटील, माजी सभापती संजय पावशे, समाजसेवक प्रदीप गायकवाड, दिलीप दाखिंकर, अजित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.


 या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवासेना उपशहर अधिकारी कमलाकर चौधरी, युवासेना विभाग अधिकारी राहुल चौधरी, उपशाखाप्रमुख विशाल मुकादम, हरिश्चंद्र म्हात्रे, सुभाष शर्मा, राजू पांडे, सिद्धांत जोगदंड, लालमन पांडे, संजय सिंग, कृष्णा सिंग, योगेश चौधरी तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना शिवसेनेच्या मेळाव्यातून मिळाला रोजगार परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना शिवसेनेच्या मेळाव्यातून मिळाला रोजगार परिवहन सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन   Reviewed by News1 Marathi on December 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads