Header AD

कोपररोड, पश्चिमकडील शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज





डोंबिवली  , शंकर जाधव   :  राज्यात सात दिवसच पुरेल एवढा रक्तसाठा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्देशित केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही, त्यामुळे रक्ताची गरज भासणारच आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आवाहनानुसार चार ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा सुदृढ करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अशाच रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शंभर रक्तदाते खास राखून ठेवले आहेत अशी माहिती म स्थायी समितीचे माजी  सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक  रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी दिली.


पश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर होत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदान रक्तदानाची रिकव्हरी ४८  तासात होते याची माहितीही रक्तदात्याला दिली जात आहे. त्यामुळे कोणीही रक्तदानाला घाबरू नका असे सांगितल्याने चांगल्या प्रकारे रक्तदाते सहकार्य करीत आहेत. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद ब्लड बँक शास्त्रीनगर डोंबिवली यांचे सहकार्य मिळाले असून बिजॉय मॅथ्यू, डॉ. चंदन कुमार, वर्षा उरावने, अभिषेक सोनार, सिद्धार्थ जाधव, निखिल पडविल यांचे सहकार्य लाभले. कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कुठेही रक्तदान शिबिर झाले नाही त्यामुळे काही शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा या घोषणाद्वारे शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी शिवसेना विभागप्रमुख मनोज रमेश म्हात्रे, शिवसेना युवा नेतृत्व प्रवीण रमेश म्हात्रे यांनी या शिबिरासाठी पाठपुरावा करून मोठा रक्तसाठा जमा केला आहे.
कोपररोड, पश्चिमकडील शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज कोपररोड, पश्चिमकडील शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads