Header AD

खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोनगावातील विविध कामांचे उद्घाटन

 

खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोनगावातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले...


भिवंडी,  प्रतिनिधी  :  कोनगावातील विविध विकासकामे व दिशादर्शक फलकाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. कोनगावाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी दिली. कोनगाव ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे, रस्ता आणि दिशादर्शक फलकाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा कोन गावातील ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.


त्यानुसार शेकडो नागरिकांना लाभ देण्यात आला. या वेळी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे, उपसरपंच जयंत टावरे, भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारी सदस्य बाळाराम कराळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष टी आर पाटील, प्रमोद हनुमान पाटील, राम माळी, भरत नकुल जाधव, संतोष रामचंद्र पाटील, कैलास बळीराम भोईर, अशोक बळीराम म्हात्रे, चारुदत्त गणपत पाटील, कमलाकर रविंद्र नाईक, डॉ. अमोल कराळे, प्रा. विनोद पाटील कोनकर आदी उपस्थित होते.


खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोनगावातील विविध कामांचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोनगावातील विविध कामांचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads