Header AD

दोन हजाराच्या बनावट नोटा चालविणायचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक


■१४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ८५ लाख ४८ हजाराच्या बनावट नोटा जप्त....

 

ठाणे, प्रतिनिधी   :  लॉकडाऊन मध्ये सोनाराची दुकान बंद झाली, विदेशात निघालेल्या संगणक मास्टरला एजंटने ठेंगा दाखविला, अशा त्रासलेल्या त्रिकुटांना चक्क भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या २ हजाराच्या बनावट नोटांसह तिघांना वागळे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडे तब्बल ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम,शाई, कतार,स्केल, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

 

वागळे युनिटने अटक केलेल्या आरोपींमध्ये सचिन गंगाराम आगरे,मन्सूर हुसेन खान आणि आरोपी चंद्रकांत महादेव माने यांचा समावेश आहे. यातील आरोपी सचिन याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. तो दुबईला नोकरीसाठी जाणार होता. मात्र त्याला एजंटने दगा दिला. त्यामुळे तो मन्सूर खान याच्या झेरॉक्सच्या दुकानात काम करीत होता. तर आरोपी मन्सूर खान हा झेरॉक्सचे दुकान चालवीत होता. तर एक आरोपी चंद्रकांत महादेव माने याचे कोल्हापूरला सोन्या-चांदीचे दुकान होते ते लॉकडाऊन मध्ये बंद झाले.


४० लाखाचे कर्ज झाले. म्हणून या तिघांनी लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी तिघांच्या युक्त्या वापरून २ हजाराच्या बनावट नोटा छपाई प्रिंटर, स्कॅनर, सॉफ्टवेअरचा वापर करून २ हजारांच्या हुबेहूब नोटा छापल्या आणि त्या बाजारात वटविण्याचा प्रयत्न कापूरबावडी परिसरात करताना वागळे युनिटच्या जाळ्यात अडकले. भारतीय चलनातील बनावट नोटा चालविण्यासाठी कापूरबावडी सर्कल येथील बसस्टॉपच्या समोर २ हजाराच्या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवून वटविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती खबऱ्याने दिलेल्या माहिती नंतर पोलीस पथकाने सापळा रचुन तिघांना ताब्यात घेतले. बनावट नोटा छपाईसाठी लागणाऱ्या साहित्यासह ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. 


पोलिसांना सापडलेल्या बनावट नोटांमध्ये सॉफ्टवेअर आणि प्रिंटर सोबतच आरोपीनी स्क्रीन प्रिंटींगची मदत घेतली होती. विशेषतः या बनावट नोटांचे सिरीयल नंबर मात्र वेगवेगळे होते याची दक्षता आरोपींनी घेतलेली होती. त्यामुळे संशय येत नव्हता. दरम्यान या नोटा दैनंदिन व्यवहारात वापरण्याचा मनोदय आरोपींचा होता अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुहा दाखल करण्यात आलाय . त्यांना  न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ डिसेंबर, पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

दोन हजाराच्या बनावट नोटा चालविणायचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक दोन हजाराच्या बनावट नोटा चालविणायचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads