भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !
डोंबिवली, शंकर जाधव : भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भोपरगाव मधील सर्व घरापर्यन्त व चाळी पर्यँत पिण्याची पाण्याची पाईपलाईन च्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. यामुळे कुठेतरी भोपरवासीयांची तहान भागेल असे दिसत आहे.कारण गेले अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न इथे ज्वलंत होत आहे.
तसेच अमृत योजनेतून ही सर्व कामे आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू ही केंद्राची राज्याची आणि महापालिकेची योजना आहे आणि ह्या योजने अंतर्गत काम करणारच असे आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येत्या ६ महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल असे मत समाजसेवक संदीप माळी यांनी ह्या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment