सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणी साठी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आपल्या क्रिटिकल केअर कार्यक्रमाला देणार नवे अद्ययावत रूप
कल्याण, मुंबई : कल्याण, डोंबिवली आणि परिसरामध्ये स्पेशलाइझ्ड क्रिटिकल केअर सेवेला असलेल्या मागणीमध्ये वाढ होत आहे. याच वाढत्या मागणीला प्रतिसाद देत अतिगंभीर रुग्णांच्या देखभालीसाठीच्या आपल्या क्रिटिकल केअर युनिटचा कायापालट घडवून आणत त्याला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे नवे, अद्ययावत रूप देण्यासाठी कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटल सज्ज झाले आहे. हॉस्पिटलने परिवर्तनाच्या या प्रक्रियेचा आराखडा तयार केला असून त्यात संशोधनांतून सिद्ध झालेल्या आचार-पद्धती (एविडन्स बेस्ड प्रोटोकॉल्स), प्रशिक्षण आणि क्रिटिकल केअर विशेषज्ज्ञांची क्षमता उभारणी या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी हॉस्पिटलने आपल्या क्रिटिकल केअर विभागाच्या विकासाची धुरा ज्येष्ठ इन्टेसिव्ह केअर कन्सल्टन्ट आणि महाराष्ट्राच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या हाती सोपवली आहे. क्रिटिकल केअर यंत्रणेतील रुग्ण व्यवस्थापनाच्या आचारपद्धती विकसित करण्याचा प्रचंड अनुभव डॉ. पंडित यांच्या गाठीशी आहे.
पॅनडेमिकने आपल्या देशातील क्रिटिकल केअर यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज ठळकपणे निदर्शनास आणून दिली आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्याच्या कामी क्रिटिकल केअर विशेषतज्ञांची बदल गेलेली भूमिकाही या काळामध्ये अधोरेखित झाली आहे. म्हणूनच कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलने आपल्या क्रिटिकल केअर कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणत भविष्यकाळासाठी सुसज्ज अशी आरोग्य संस्था उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी अतिदक्षता विभागासाठीचे धोरण, शिष्टाचार आणि रुग्णाच्या देखभालीसाठीचे नियम व रिती सुस्थापित करण्याच्या कामी डॉ. पंडित महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याखेरीज सेंटरमधील क्रिटिकल केअर डॉक्टर्स आणि परिचारकांसाठी शैक्षणिक कार्यक्रमही ते आखून देणार आहेत. अशाप्रकारे क्रिटिकल केअर विभागाची सूत्रे डॉ. राहुल पंडित यांच्या हाती देत हॉस्पिटलच्या पोस्ट कोविड-१९ ओपीडी सेवाही सुरू केल्या आहेत.
पॅनडेमिकमुळे देशभरातील हॉस्पिटल्सना आपल्या अतिगंभीर रुग्णांसाठीच्या विभागाच्या कार्यपद्धतीचा नव्याने विचार करणे अनिवार्य झाले आहे, रुग्णाची देखभाल करण्याच्या काही विशिष्ट पारंपरिक कार्यपद्धतींना नवे रूप देणे आणि रुग्णांच्या आजच्या तसेच भविष्यात निर्माण होऊ शकणा-या गरजांशी सहजतेने जुळवून घेणेही भाग पडले आहे, असे निरीक्षण फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथील क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित मांडतात.
‘’क्रिटिकल केअर व्यवस्थेमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला ब-यापैकी धोका संभवतो आणि पॅनडेमिकच्या काळात आम्ही या गोष्टीची अनुभव घेतला आहे. गंभीररित्या आजारी रुग्णांची देखभाल हा एक गुंतागुंतीचा विषय आहे व सेवा-संसाधनांच्या उपलब्धतेवर त्याची सारी मदार आहे. रुग्णांची सुरक्षितता जपण्याची संस्कृती आरोग्य संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये अंगभूत असावी ही बहुतेकदा रुग्णांच्या देखभालीचा दर्जा वाढविण्याची एक प्राथमिक पद्धत मानली जाते. पण त्यासाठी योग्य संसाधने, मनुष्यबळ आणि तज्ज्ञ व्यक्ती हे सारे उपलब्ध असायला हवे. आमच्या कल्याण सेंटरमध्ये आम्ही सुधारणेची गरज असलेल्या बाबी शोधून काढल्या आहेत. यात प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी यांचाही समावेश आहे. आरोग्यसेवा पुरविण्याच्या कामी हे सेंटर ऑफ एक्सनलन्स (CoE) अनेक पटींनी सुधारणा घडवून आणेल व त्यामुळे रुग्णांच्या देखभालीबाबत अधिक चांगले परिणाम मिळू शकतील.‘’ डॉ. पंडित पुढे म्हणाले.
डॉ. सुप्रिया अमे, फॅसिलिटी डायरेक्टर, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण पुढे म्हणाल्या, ‘’पॅनडेमिकच्या काळात क्रिटिकल केअरच्या भूमिकेमध्ये वेगाने बदल घडून आले आहेत. या काळात दर्जेदार देखभाल पुरविण्याच्या गरजेबरोबरच रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंडित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या CoE मध्ये विद्यमान शैक्षणिक कार्यक्रम व कर्मचारीवर्गाचे प्रशिक्षण, रुग्ण व्यवस्थापनासाठीच्या सर्वोत्तम मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, संसर्ग प्रतिबंधक धोरणांचे कठोर पालन आणि क्रिटिकल केअर व्यवस्थेमध्ये रुग्णांच्या देखभालीच्या पद्धतीवर हुकुमत मिळविणे या सर्व गोष्टींना वेग देणार आहोत. डॉ. पंडित आमच्या हॉस्पिटलमध्ये कोविड होऊन गेल्यानंतरच्या समुपदेशनासाठी येणा-या रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठीही उपलब्ध असणार आहेत या गोष्टीचाही आम्हाला आनंद आहे.’’
डॉ. राहुल पंडित दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी १० ते ११ पोस्ट-कोव्हिड ओपीडीमध्ये उपलब्ध असतील, 88821 01101 या क्रमांकावरून त्यांची अपॉइंटमेंट घेता येईल.

Post a Comment