Header AD

त्या मुलांच्या आईने आत्महत्या केली नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

 डोंबिवली, शंकर जाधव : डोंबिवलीतील एका खाडीत सापडलेल्या दोन चिमुकल्या मुलांच्या आईचा पोलीस शोध घेत आहे. ती कुठे गेली असावी,तिने असे कठोर पाउल का उचलले,मुलांना सोडून जाण्याचा निर्णय का घेतला असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहे. याघटनेची चर्चा शहरात सुरु असताना पोलिसांनी मात्र त्या मुलांच्या आईने आत्महत्या केली नसल्याचा प्राथमिक अंदाज पत्रकारांनी बोलताना व्यक्त केला आहे.

 


७ डिसेंबर रोजी सायंकाळी  डोंबिवलीतील खाडीत पाण्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या दगडावर सहा महिन्याचे बाल आणि दोन वर्षाचा लहानगा रडत होता. चोरे गावातील गणेश मुकादम आणि तेजस मुकादम हे दोन तरुण धीराने पाण्यात उतरले. दोन चिमुकल्यांना बाहेर काढून त्यांना विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. लहान मुलांजवळ आईचा मोबाईल सापडला. त्यानंतर ठाकुर्ली परिसरात राहणारा सुब्रतो साहू ही व्यक्ती पोलिसांसमोर आली. स्नेहांश साहू आणि अयांश साहू अशी मुलांची नावं असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने पत्नी रत्नमाला साहूसोबत वाद व्हायचा. मात्र ती इतक्या टोकाचे पाऊल उचलेलअसं सुब्रतो यांना आजही वाटत नाही.टिळकनगर पोलीस त्या मुलाच्या आईचा शोध घेत असून त्या मुलांच्या आईने आत्महत्या केली नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी याबाबतचे संदेश सर्व पोलीस ठाण्यात दिले. परंतु दहा दिवसानंतरही त्या महिलेचा सुगावा काहीच लागला नाही. जर आत्महत्या केली असती तर आजपर्यंत समजून आले असते. त्यामुळे त्या मुलांच्या आईने आत्महत्यासारखे पाऊल उचलले नसून कदाचित जीवित असण्याची दाट शक्यता असल्याचा तर्क टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी वर्तविला आहे.कचोरे खाडीकिनारी ती मुले आढळून आल्यानंतर त्याचा तपास पोलीस करत आहे. परंतु घटनेतील वडील ९० फिट रोड विभागातील रहिवासी असल्याने आणि त्या मुलांच्या आईचा ब्युटीपार्लर व्यवसाय ठिकाण टिळकनगर हद्दीत असल्याने याचा तपास टिळकनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला. टिळकनगर पोलिसांना तपासा दरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे घटनेपूर्वी आई त्या दोन मुलांना घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज मध्ये दिसत आहे. त्यामुळे त्या महिलेची ओळख झाली आहे. सदर महिलेने आत्महत्या केली नसून तिचा शोध सुरु आहे तर  पतीसुद्धा ती आत्महत्या करेल याबद्दल सहमत नाहीअसे तिच्या पतीने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांचे जरी आर्थिक परिस्थितीमुळे खटके उडत असले तरी अगदी ते विकोप्याचे नव्हते अशी माहिती त्यांनी पोलिसांनी दिली आहे.सद्यस्थितीत त्या दोन मुलांचा ताबा वडिलांना मिळाला असून त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्या मुलांच्या वडिलांना सहकार्य करीत असल्याचेही माहिती मिळत आहे.कदाचित त्या मुलांच्या आईला आपली ओळख दाखविल्यानंतर बदनामी होईल आणि त्याचा मनस्ताप होईल त्यामुळे ती समोर येईल का असे अनेक प्रश्न पोलिसांना पडला आहे. स्नेहांश साहूहिचे बीड येथे माहेर असून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना संपर्क साधला आहे. दरम्यान या तपासात पोलीस काही धागेदोरे मिळतात का याकडे तपासाची दिशा आहे. मुलाचीं आई सापडल्यास तिने असे कठोर पाउल का उचलले याची माहिती समोर येईल असे वपोनि धुरी यांनी सांगितले. 

त्या मुलांच्या आईने आत्महत्या केली नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज त्या मुलांच्या आईने आत्महत्या केली नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज Reviewed by News1 Marathi on December 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads