कल्याण , कुणाल म्हात्रे : भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर सरदार तानाजी मालुसरे संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध व्यक्त करत निदर्शेने करण्यात आली.
प्रताप सरनाईक यांच्यासारखी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेवर निवडून जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्या शूरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. अशा शूरवीर व्यक्ती बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे यावेळीं जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, संजय मोरे, , अर्जुन म्हात्रे, नाना सूर्यवंशी, डॉ. राजू राम, निखिल चव्हाण, संजय कारभारी, महिला कार्यकारिणी तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Post a Comment