डॉक्टर वैभव क्षीरसागर आय.एम.ए च्या वतीने सन्मानित
■रूग्ण, सेवा हीच ईश्वर सेवा मानित रुग्ण सेवा करणारा डाँक्टर अवलिया....
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील मधील मिलिंद नगर, घोलपनगर,अनुपन नगर, गौरीपाडा, टावरीपाडा या परिसरातील गोरगरीब, अर्थिक दुर्बल वर्गाला आजारापणात माफक दरात रूग्ण सेवा देणारे अवलिया डाँक्टर वैभव क्षीरसागर यांना आय.एम.ए च्या वतीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानित रंजल्या गांजल्यांसाठी स्पंदन किल्निकच्या माध्यमातून ओपीडीमध्ये सर्दी, खोकला, ताप, किरोकोळ आजार, दुखापत झालेल्या रूग्णांची तपसणी करीत माफक दरात औषधे देत रूग्ण सेवा करीत आहेत. करोना काळात त्यांनी आपली ओपीडी एकही दिवस बंद न ठेवता सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत रूग्णांची आँक्सीजन लेवल्, पल्स रेट, तापमान आदी तपासणी करीत दिलासा देत माफक दरात रूग्ण सेवा केली.
तसेच मनपाच्या हाकेला धावुन जात चिकणघर येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात देखील रूग्ण तपासणी करण्याचे काम करुन संध्याकाळी आपला दवाखाना सुरू ठेवत रूग्ण सेवा केली. त्यांच्या या कामांची दखल घेत आयएमएच्या स्पिग्र टाईम येथील क्रार्यक्रमात त्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला.

Post a Comment