Header AD

कोविड रुग्ण कमी होत असताना ठाण्यात आणखी दोन कोविड सेंटर सुरु का केले


 

    ■किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल...


डोंबिवली , शंकर जाधव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाणे जिल्ह्यातील कोविड सेंटरची पाहणी आणि येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी भाजप नेते किरीट किरीट सोमय्या यांनी ठरविले आहे.याची सुरुवात शुक्रवारी डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरपासून केली.यावेळी आमदार रविंद्र चव्हाण,नगरसेवक मुकुंद पेडणेकर,निलेश म्हात्रे, भाजप डोंबिवली शहर पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांसह अनेक कार्यकर्ते आणि प्रशासकीय हॉस्पीटल मॅनेजमेंटच्या रोहिणी लोकरे उपस्थित होते.कोविड सेंटरची पाहणी केल्यानंतर सोमय्या यांनी कोविड रुग्ण कमी होत असताना ठाण्यात आणखी दोन कोविड सेंटर सुरु का केले असा सवाल उपस्थित केला. म्हणूनच मी ठाणे जिह्यातील कोविड सेंटरची पाहणी करत आहे. कोविड सेंटरचे फायनान्स ऑडीड आणि परफोमन्स ऑडीड हे आम्ही सुरु केले आहे. प्रत्यक्ष फींडवर आज आम्ही  आहोत.कोविड सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी आहे का ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्नही यावेळी उपस्थित करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.


डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या येणार असल्याने सेंटर बाहेर भाजप कार्यकर्ते आले होते. कोविड सेंटरची पाहणी करण्याआधी हे सेटर चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सोमय्या यांना सांगण्यात आले. कामगारांचा पगार त्याच्या खात्यात जायला हवा होता. ठेकेदार कामगारांची फसवणूक करत आहे.त्यावेळी सोमय्या यांनी ठेकेदाराला नव्हे तर डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे कौतुक करत सन्मानपत्र देऊ असे सांगितले. काही वेळाने सोमय्या यांनी पीपीकिट घालून सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले,कोरोना रुग्णाचा आकडा कमी असताना ठाण्यात शिवसेनेने दोन नवीन कोविड सेंटर का सुरु केले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला द्यावे.


कोविड सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी आहे का ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्नही उपस्थित करत कोविड सेंटर हे ठाकरे सरकारचे लक्ष असल्याचा आरोप केला.तर कोविड सेंटर येथील कर्मचारी वर्गाला पगार वेळेवर मिळतो कि नाही ? सेंटर मध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत आहे कि नाही ? याची पाहणीहि करण्यासाठी आलो आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे १०० कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार असल्याबाबत विचारले असता त्यांनी `हिम्मत असेल तर प्रताप सरनाईक यांनी माझ्यावर दावा टाकून दाखव,अश्या धमक्यांना भाजप घाबरत नाही असे ठामपणे सांगितले.प्रताप सरनाईक हे एक नंबरचे भष्ट्र व्यक्ती आहेत.ठाणे महानगरपालिकेने सरनाईक यांना संरक्षण दिले आहे. त्यांनी घोटाळा केला आहे.

कोविड रुग्ण कमी होत असताना ठाण्यात आणखी दोन कोविड सेंटर सुरु का केले कोविड रुग्ण कमी होत असताना ठाण्यात आणखी दोन कोविड सेंटर सुरु का केले Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads