Header AD

कल्याण डोंबिवलीत १६३ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५४,४६० एकूण रुग्ण तर १०६३ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११७ रुग्णांना डिस्चार्ज....कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १६३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    आजच्या या १६३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,४६० झाली आहे. यामध्ये १७१५ रुग्ण उपचार घेत असून ५१,६८२  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३१कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व –४९डोंबिवली प – ३९मांडाटिटवाळा – तर मोहना येथील ४ रूग्णाचा समावेश आहे.        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २९ रुग्ण टाटा आमंत्रामधून१० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १६३ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १६३ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads