Header AD

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षके तरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा


■टीजेएसबी बँकेकडून शिक्षक संघटनांची मागणी मान्य...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) ३५ लाखाचा अपघाती विमा घोषित केला आहे. याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शिक्षकांना होणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी सांगितले. 


टीजेएसीबी मध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५ हजाराहून अधिक शिक्षक खातेदार असून शिक्षकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सोमवारी बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अधिकारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारेकोकण विभाग संयोजक एन एम भामरेठाणे संयोजक संदीप कालेकरशिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष गजानन पाटीलराष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश मदने व पदाधिकारी राम पिसाटविजय कोल्हेसंतोष बुवा आदी पदाधिकारी व टीजेएसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील साठेसरव्यवस्थापक स्वप्नील जांभूळेव्यवस्थापक प्रसाद मथुरे  उपस्थित होते.


अपघातामध्ये एक अवयव निकामी झाल्यास ५० टक्के तर दोन अवयव निकामी झाली तर  विम्याची पूर्ण रक्कम मिळणार असल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले. संघटनांकडून यावेळी बँकेकडे अनेक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. त्यामध्ये सेवेत असतांना नैसर्गिक मृत्य झालेल्या कर्मचाऱ्यांना निधी देणेओडीच्या सुविधासाठी शुल्क न आकारणे यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाचे व्याजदर कमी करणे या मागण्या करण्यात आल्या त्यावर बँक सकारात्मक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षके तरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा  ठाणे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षके तरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads