Header AD

बाल भिकारी मुक्त भारत अभियान चालविणाऱ्या चिरंजीवी संघटनेचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न




भिवंडी ,  प्रतिनिधी  :  बचपन बचाओ मानवता बचाओ, बालभिकारी मुक्त भारत या संकल्पना राबविण्या साठी झटणाऱ्या चिरंजीवी संघटनेचा आठवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला .संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी या प्रसंगी बोलताना चिरंजीवी संघटनेतील कार्यकर्ता म्हणजे बालकांना मार्गदर्शन करणारा त्यांचा जिवलग मित्रच असतो. त्यांचे बालकांशी कोणतेच रक्ताचे नाते नसले तरीही त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यांना सोडविण्यासाठी तो झटत असतो.असा कार्यकर्ता आपल्या संघटनेत काम करीत असल्याचा अभिमान राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकर हिने जिनियस मैत्रकूल, कडापे माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.


या कार्यक्रम दरम्यान संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक किशोर जगताप ह्यांनी सर्व कार्यकर्त्यांना फेसबुक लाईव्ह द्वारा मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या .तर चिरंजीवी संघटनेच्या नव्या कार्यकरणीची घोषणा करण्यात आली असून त्यात राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी, राष्ट्रीय कार्यवाह राहुल भाट आणि महाराष्ट्र राज्यध्यक्षा नेहा भोसले , राज्यकार्यवाह ऐश्वर्या तोडकरी,
राष्ट्रीय संपर्क अधिकारी चेतन कांबळे व राहुल बनसोडे यांची निवड करीत  त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .
बाल भिकारी मुक्त भारत अभियान चालविणाऱ्या चिरंजीवी संघटनेचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न बाल भिकारी मुक्त भारत अभियान चालविणाऱ्या चिरंजीवी संघटनेचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न Reviewed by News1 Marathi on December 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads