कल्याण एसी लोकल ट्रेन सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत महेश तपासे
डोंबिवली , शंकर जाधव : कल्याण जंक्शन ते मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तसेच डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे वातानुकूलित लोकल ट्रेन सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने केले आहे. कल्याण जंक्शन व डोंबिवली स्थानक येथील वाढती लोकसंख्या याचाही विचार सेंट्रल रेल्वेने करावा तसेच अधिकच्या गाड्या ह्या दोन स्थानकावरून सोडण्याच्या संदर्भात व रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना अधिकच्या सुविधा देण्याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
दरम्यान डोंबिवलीरेल्वे स्थानकातून दिवसातून सकाळी आणि सायंकाळी अश्या दिवसातून दोन फेऱ्या होणार आहे.राज्य सरकारने परवानगी दिलेल्या प्रवाश्यांना या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तर प्रवाश्यांच्या प्रतिसादानुसार फेऱ्या वाढविणार आहेत.

Post a Comment