Header AD

कल्याण डोंबिवलीत १०१ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

 

■५७,३९९ एकूण रुग्ण तर ११०१ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ९१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज नव्या १०१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या १०१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,३९९ झाली आहे. यामध्ये १००९ रुग्ण उपचार घेत असून ५५,२८९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०कल्याण प – २९डोंबिवली पूर्व ३४डोंबिवली प – २३, मांडा टिटवाळा -३ तर मोहना येथील २ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १९ रुग्ण हे टाटा आमंत्रा मधून, ३ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०१ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १०१ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads