Header AD

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका युट्युबवर प्रसारित

 कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास विद्यार्थ्यांना आणि समाजाला कळवाबाबासाहेबांचा त्यागत्यांचे शिक्षणघरची परिस्थिती आणि समाजाबद्दलची असणारी आत्मीयता प्रगट व्हावी यादृष्टीने "प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" या पुस्तकावर आधारीत पंधरा भागांची मालिका लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर ३ डिसेंबर पासून प्रसारित करण्यात आली. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.


 या पुस्तकाचे लेखक डॉक्टर योगेश जोशी व हरिश्चंद्र देवळे हे आहेत. या व्हिडिओ मालिकेची संकल्पनादिग्दर्शनव्हिडिओ निर्मिती अजय पाटील यांनी केले असून यामध्ये पंधरा दिवस वेगवेगळ्या कलाकारांकडून कथांचे अभिवाचन करून घेतले आहे. यामध्ये शारदा वाहाणेकविता नागावेकरशुभांगी म्हात्रेअजय पाटीलविद्या शिर्केज्योती धुमाळसुचिता आरजचित्रलेखा जाधवसंध्या दिवकर,ललिता मोरेनिता मोरेहेमंत नेहते या ठाणे रायगडमधील शिक्षकांनी कथांचे अभिवाचन केले आहे. व्हिडिओ एडिटिंग आकाश पाटीलपार्श्वसंगीत आदर्श पाटील यांनी केले आहे.


 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जागविण्याचा सार्थ प्रयत्न लक्ष्मी चित्रच्या यूट्यूब चँनलच्या माध्यमातून केला जात आहे. या उपक्रमाला भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. तसेच शिक्षण विस्ताराधिकारी संजय  असवले,केंद्रप्रमुख जयश्री सोरटे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सलग पंधरा दिवस चालणाऱ्या या व्हिडिओ मालिकेत शेवटी प्रश्नमंजुषा घेतले जाणार असून विजेत्यांना योग्य बक्षीस दिले जाणार आहे.  सर्वच स्तरातून या मालिकेचे अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत झाले असून भविष्यातही अशाच व्हिडिओ मालिका तयार करण्याचा मनोदय अजय पाटील यांनी व्यक्त केला.

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका युट्युबवर प्रसारित प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका युट्युबवर प्रसारित Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads