प्रभाग समित्यां प्रमाणेच ठाणे महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदीही महिलांना प्राधान्य : महापौर नरेश म्हस्के
ठाणे, प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतीपदाची निवडप्रक्रिया आज पूर्ण झाली. पिठासीन अधिकारी म्हणून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज या निवडणुका पार पडल्या. प्रभागसमितीप्रमाणेच विशेष समित्यांवरही बहुतांश महिला नगरसेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक वेबिनारच्या माध्यमातून आज (शुक्रवार 11 डिसेंबर) पार पडली.
आरोग्य समिती, क्रीडा व सांस्कृतिक समिती, गलिच्छवस्ती निर्मुलन समिती, महिला व बालकल्याण समिती व शिक्षणसमित्यांच्या अध्यक्षांची आज निवड करण्यात आली. आरोग्य समिती सभापतीपदी निशा पाटील, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी प्रियांका पाटील, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, महिला व बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर तर शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांची बिनविरोध निवड झाली.
महापालिकेच्या पाच विशेष समित्यांचे गठन आज झाले असून पाच समित्यांपैकी चार समित्यांवर महिलांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment