Header AD

शेतकऱ्यांच्या भारत बंदला कल्याण मध्ये संमिश्र प्रतिसाद कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या आजच्या भारत बंदला कल्याण डोंबिवलीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व व्यापा-यांनी कडकडीत बंद पाळत शेतकरी आंदोलनाला संपूर्ण पाठींबा दिला.


केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १० दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. ज्याला महाराष्ट्रात शिवसेनाकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला होता. तर राज्यातील मुंबईनाशिकनवी मुंबई या प्रमूख कृषी उत्पन्न बाजार समितीसह कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतिल व्यापाऱ्यांनीही बंदला समर्थन दिले होते. त्यानूसार आज कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळल्याचे दिसून आले.


त्याचबरोबर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघातर्फेही रिक्षा-टॅक्सीचालकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला तुरळक रिक्षा चालकांनी प्रतिसाद दिला. कल्याण स्टेशन परिसरात सकाळी गर्दीच्या वेळी नेहमीपेक्षा काहीशी कमीच वर्दळ दिसून आली. शिवसेनाराष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे ठिक ठिकाणी रस्त्यावर उतरत बंदचे आवाहन केले जात होते. मात्र शहरातील काही दुकाने वगळता सर्व आर्थिक व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.


दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमधील प्रमूख ठिकाणी आणि प्रमुख चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्वच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यावेळी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला कल्याण मध्ये संमिश्र प्रतिसाद कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद शेतकऱ्यांच्या भारत बंदला कल्याण मध्ये संमिश्र प्रतिसाद कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads