Header AD

१८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  १८  गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय ठाकरे सरकारने बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी केला असल्याचा आरोप  भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.


राज्य सरकारचा कल्याण डोंबिवलीतील १८ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजप अमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. २७ गावांची नगरपरिषद झाली पाहिजे होती. पण २७ पैकी ९ गावे राजकीय फायद्यासाठी महापालिकेत घेतली गेली. त्यांनी ९  गावे महापालिकेत ठेवून त्यांच्या सोयीप्रमाणे केलं आहे. यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहेअसा आरोप आमदार गणपत गायकवाड  यांनी केला आहे.


२७ गावांची वेगळी नगरपरिषद बनवायची होती. ही नगरपरिषद झाली तर शेतकरी बांधवांचा एफएसआयचा जो विषय आहेटीडीआर नगरपरिषदेत कमी भेटेल तर महापालिकेत जास्त भेटेल. तरीसुद्धा वेगळी नगरपरिषद असावीअशी लोकांची भावना होती. त्यामुळे आम्ही नगरपरिषदेसाठी तयार होतो. पण २७ गावातील ९ गावे जेव्हा बाहेर निघाले त्यावेळी राजकीय घोषणाबाजी करणाऱ्या कोणत्याच नेत्याने आवाज उठवला नाही, यामागे मोठ्या बिल्डरलॉबीचा हात असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य जनतेची दिशाभूल होते. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो अशी भूमिका गणपत गायकवाड यांनी मांडली.

१८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप १८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads