मुबंई नाशिक महा मार्गावरील पडघा टोल नाक्यावर वाहतूक कोंडी
भिवंडी , प्रतिनिधी : मुबंई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर सकाळपासून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला तर वाहनचालक पुरते बेजार झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी नाताळची सुट्टी आणि नंतर शनिवार रविवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आणि त्यात महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्याने नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करता येणार नसल्याने मुंबई ठाण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नाशिक,भंडारदरा आणि शिर्डी येथे जाण्यासाठी निघाल्याने पडघा टोल नाक्यावर वाहनांची एकच गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
त्यात अजूनही कित्येक वाहनचालकांनी फास्ट टॅग लावले नसल्याने टोल नाक्यावर टोल नाका व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या गलथान नियोजनामुळे टोल भरण्यासाठी वेळ लागत होता.आणि शासनाच्या नियमानुसार टोल नाक्याच्या आधी पिवळ्या पट्ट्यातील वाहनांकडून टोल घेऊ नये असे निर्देश असतानाही टोल कर्मचारी जबरदस्तीने दादागिरी करीत टोल आकारत असल्याने वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यात खूप वेळा खटके उडाल्याचे दिसून आले.येथील यावेळी येथील कर्मचारी टोल आकारण्यासाठी दादागिरी करताना दिसून आले परंतु वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत करताना दिसून येत नव्हते यामुळे वाहनचलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुबंई नाशिक महा मार्गावरील पडघा टोल नाक्यावर वाहतूक कोंडी
Reviewed by News1 Marathi
on
December 25, 2020
Rating:

Post a Comment