राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अविनाश दादा धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी कर्मचार्यांना मास्क वाटप
ठाणे , प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अविनाश दादा धायगुडे यांचा वाढदिवस ठाण्यात सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यंदा कोरोनाचे सावट असल्याने अविनाशदादा धायगुडे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करा असे आव्हान केले होते .त्या अनुषंगाने ठाणे शहरातील कार्यकर्ते तुषार धायगुडे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अविनाश दादा धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील खोपट एसटी आगारातील एसटी चालक-वाहक व कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला एसटीचे ठाणे विभाग वाहतूक अधिकारी रमेश बांदल,खोपट आगार व्यवस्थापक प्रतिभा भांगरे,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,उपसचिव तुषार धायगुडे,कार्यकारणी सदस्य सुरेश भांड,आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेत आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता अविनाशदादा धायगुडे यांचे कार्यकर्ते तुषार धायगुडे यांनी ठाण्यातील खोपट आगारातील एसटी चालक-वाहक व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना मास्कचे वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

Post a Comment