Header AD

भिवंडीत ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात पडून दोन जण जखमी नागरिकांच्या सुरक्षेकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष





भिवंडी , प्रतिनिधी   :  ड्रेनेज लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा शहरामध्ये होत असतांनाच आता ड्रेनेजलाईनच्या ठेकेदारांच्या दुर्लक्षित कारभार चव्हाट्यावर आला आहे. ड्रेनेज लाईन साठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पद्मानगर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे या खड्डया भोवती ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने रोजच या खड्ड्यामध्ये नागरिक पडत आहेत.


नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ड्रेनेज लाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे असतांनाही स्वतःच्या फक्त फायद्याचा विचार करणाऱ्या ठेकेदारांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी येथे घेतली जात नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे राजरोसपणे ठेकेदारांची कामांमध्ये हलगर्जीपणा होत असतांनाही मनपा प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिका प्रशासनाविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.


दरम्यान ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात पडलेल्या दोघा जखमींना स्थानिकांनी बाहेर काढले . मात्र या खड्ड्यात नागरिक पडल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला असल्याने मनपा प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे. ड्रेनेज लाईन ठेकेदारांच्या या व अशा हलगर्जी कारभाराकडे मनपा प्रशासन आतातरी लक्ष देणार का ? अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहेत. 
भिवंडीत ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात पडून दोन जण जखमी नागरिकांच्या सुरक्षेकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष भिवंडीत ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात पडून दोन जण जखमी नागरिकांच्या सुरक्षेकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले

मुंबई, १८ जानेवारी २०२१ :  मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या ...

Post AD

home ads