Header AD

हत्यारांचा धाक दाखवून मुंबई - नाशिक महामार्गावर लुटणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी केले अटक




भिवंडी , प्रतिनिधी  :  मुंबई - नाशिक महामार्गावर  वाहन चालकांना लुटण्याचा घटना वारंवार होत असतानाच मध्यरात्री च्या सुमारास टेम्पो चालकास लुटून ट्रिपल सीट दुचाकीवरून कल्याणच्या दिशेने पळून जाणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्या जवळून  हत्यारासह संपूर्ण मुद्देमलासह दुचाकी जप्त केली आहे .पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रफिक अहमद झहीरुद्दीन खान हा टेम्पो चालक यवई नाका येथील सिंग ट्रान्सपोर्ट समोर आपली टेम्पो उभी करून झोपला असता त्या ठिकाणी दुचाकी वरून आलेले आकाश राजेश कंडारे ; २५, फारमान सलीम शेख ; २१, वसंत चंद्रकांत मिश्रा ;२१ सर्व राहणार कल्याण या आरोपींनी फिर्यादिस धमकावून टेम्पोचा दरवाजा उघडण्यास सांगितले असता टेम्पो चालकाने भीतीने टेम्पो राजनोली नाक्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळविला असता या त्रिकूटने त्यास रस्त्यात गाठून टेम्पो समोर दुचाकी आडवी उभी करून चालकास टेम्पो बाहेर खेचत मारहाण करून त्या कडील मोबाईल रोख रक्कम असा ११ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून त्याच्या टेम्पोचे नुकसान करून पळून जात असतानाच या घटनेची खबर कोनगाव पोलीस ठाण्यास मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व त्यांच्या पथकातील पीएसआय डी पी नागरे,पोलीस कर्मचारी शिंदे, मोरे, पवार,दहीफळे, ढवळे या पथकाने कल्याणच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून पळून जात असलेल्या तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून दोन चॉपर, एक फायटर ,मारदांडा असे घटक शस्त्र जप्त करीत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे .या कामगिरी बद्दल पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत ढोल यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे व गस्त प्रमाण वाढविल्याने अनेक गुन्हेगार अटक करण्यात पोलिसांना यश येत असल्याचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे
हत्यारांचा धाक दाखवून मुंबई - नाशिक महामार्गावर लुटणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी केले अटक हत्यारांचा धाक दाखवून मुंबई - नाशिक महामार्गावर लुटणाऱ्या त्रिकुटास कोनगाव पोलिसांनी केले अटक Reviewed by News1 Marathi on December 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads